Kshirsagar Cancer Clinic          
       

स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार पध्दती

स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार पध्दती

स्तनाचा कर्करोग आज भारतात महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे.३० महिलांची तपासणी झाल्यास एका महिलेला स्तनाचा कर्करोग आढळत आहे.चाळीस वर्षा नंतर स्तनांमध्ये न दुखाणारी गाठ कर्करोग असू शकतो.त्याचा काहीही त्रास नसल्यामुळे निदान करण्यास उशीर होतो त्यामुळे सर्व महिलांनी ३० वर्षे वयानंतर दर महिन्याला स्वतः स्तनांची तपासणी (Breast self examination) व ४० वयानंतर मॅमोग्राफी ही तपासणी वर्षातून एकदा करणे अत्यावश्यक आहे. हे केल्यास आपण लवकर स्तनाच्या कर्करोगाचे निदान करतो आणि आपण स्तन ही वाचवू शकतो त्यास आपण Breast Conservation Surgery म्हणतो.

स्तनाचा कॅन्सर चाळीस वर्षानंतर केंव्हाही होतो तसेच अनुवांशिक असल्यास 30 वर्षा नंतर ही पुढील लक्षणे असतील तर तज्ञ कॅन्सर सर्जन चा सल्ला घेणे आवश्यक आहे

 • स्तनात न दुखाणारी गाठ
 • स्तनातून रक्त येणे
 • स्तनावर सूज येणे
 • स्तना वर न भरणारी जखम होणे
 • काखेत व मानेवर गाठी येणे
 • स्तनाला न थांबणारी खाज येणे

योग्य वेळी तज्ञ कॅन्सर सर्जन चे मार्गदर्शन आणि तपासण्या तुमचा प्राण वाचवू शकतात.

लक्षणे जर लक्षवेधी असतील तर या तपासण्या केल्या जातात

 1. बायोप्सी
 2. मॅमोग्राफी
 3. पोटाची सोनोग्राफी
 4. CT स्कॅन किंवा PET CT स्कॅन

यातील आवश्यक तपासण्या करून कॅन्सर ची स्टेज ठरवली जाते.

पहिल्या व दुसऱ्या स्टेज मध्ये ऑपरेशन करून पेशंटला पूर्ण बरे करता येते.

ऑपरेशन विषयी थोडक्यात
 1. Modified Radical Mastectomy – पूर्ण स्तन व काखेतील गाठी काढणे
 2. Breast conservation surgery – पहिल्या व काही दुसऱ्या स्टेज मध्ये जर काही अटींची पूर्तता होत असेल तर स्तन पूर्ण न काढता केवळ गाठ (lumpectomy), काखेतील गाठी काढून नंतर प्लास्टिक सर्जरी(oncoplasty) करून स्तन व त्याचा आकार तसाच ठेवता येतो परंतु या नंतर रेडीएशन थेरपी घेणे बंधनकारक असते.
 3. तिसऱ्या स्टेज मध्ये chemotherapy देऊन नंतर शस्रक्रिया केली जाते.
 4. चवथ्या स्टेज मध्ये आजार पूर्ण बरा करता येत नाही. chemotherpy आणि Hormonal थेरपी करून काही महिने ते वर्ष आयुष्य वाढवता येते.

त्यामुळे आपल्या मनातील भीती दूर सारून ४० वर्षे वयानंतर वर्षातून एकदा mammograpy ने आपण स्तनाचा कॅन्सर लवकर निदान करून पूर्ण बरा करू शकतो व स्तन पूर्ण काढण्याची ही गरज नसते.

Comments are closed.

Contact Us!

This will close in 3000 seconds

Need Help?